
(प्रतिनिधी:अमोल खरात)
जामनेर:शहरातील १५डिसेंबरपासून बेपत्ता असलेल्या दत्त चैतन्य नगर येथील निलेश राजेंद्र कासार वय ३० वर्ष याचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
निलेशचा मृतदेह शुक्रवारी सकाळी शिरसोलीजवळ असलेल्या नेव्हरे धरणातून बाहेर काढण्यात आला. एलटीआय फायनान्स कंपनीतील कामाच्या वादातूनच हा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार मयत निलेशचे मित्र असलेले दिनेश चौधरी(वय २० वर्ष रा.तळई ता. एरंडोल)व भूषण पाटील (वय २० वर्ष पिंपरी ता.चोपडा)यांनी फायनान्स प्रकरण मंजुरीच्या निमित्ताने निलेशला शिरसोली येथे बोलावले होते.
काही दिवसांपूर्वी मयत निलेश कासार व भूषण पाटील याचे किरकोळ वाद झाले होते! हाच जूना वाद त्यांनी मनात ठेवून दोघांनी निलेशचा दोरीने गळा आवळून खून केला व मृतदेह पोत्यात टाकून धरणात फेकून दिला. एमआयडीसी पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या आधारे तपास केला व संशयित आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसी खाकया दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली असून निलेशच्या नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश सुरू आहे.
पोलीस पुढील तपास करत आहेत. निलेश राजेंद्र कासार हा तरुण दि.१५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून जळगाव येथून बेपत्ता झाला होता. दरम्यान, काल सांध्यकाळी जळगाव येथून जवळच शिरसोली रोडवरील रामदेववाडी परिसरात निलेश कासार याची मोटारसायकल आढळून आली होती. मात्र तरुणाचा कोणताही पत्ता लागत नव्हता. निलेश बेपत्ता झाल्यापासून त्याचा मोबाईल फोन बंद येत होता, यामुळे नातेवाईकांची चिंता अधिकच वाढली होती. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती, पोलिसांकडून सर्व बाबींचे चक्रे फिरवून तपास सुरू होता.
या प्रकरणात पोलिसांना आज सकाळी निलेशचा मृतदेह आढळून आला त्यांनी काही गोष्टी तपासून हा मृतदेह नीलेश चा असल्याचे स्पष्ट झाले!







