
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
साकळी येथील सौ विद्याताई वसंतराव महाजन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने आयोजित स्नेहसंमेलन- २०२५ दि.१२ रोजी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष भास्करराव महाजन हे होते.तसेच कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विद्याताई वसंतराव महाजन, कार्याध्यक्ष प्रमोद सोनवणे,जेष्ठ संचालक मुख्तार तडवी, संचालक शामकांत महाजन, सचिव गंगाराम कोळी यांचे सह सर्व सन्मा. संचालक मंडळ, शारदा विद्या मंदिर शाळेचे प्राचार्य आर. जे. महाजन सर, पर्यवेक्षक एस.जे. पवार सर, शिरसाडचे मुरलीधर आप्पा पाटील यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष दिवंगत सभासद देशाचे वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मान्यवराच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या उदघाटन संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले . गणेश वंदना या सामूहिक नृत्याने स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली, सोलो परफॉर्मन्स, कोळी नृत्य, सामुयिक नृत्य, देशभक्तीपर नृत्य असे विविध बहारदार कार्यक्रम लहान चिमुकल्यांनी सादर केले या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित रसिकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला. प्री-प्रायमरी च्या लहान- चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विद्याताई महाजन तसेच संचालकांनी व्यासपीठावर जाऊन कौतुक केले हे विशेष होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक समाधान बडगुजर सर यांनी केले तर सूत्रसंचालन वैशाली चौधरी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन ललिता मराठे मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक समाधान बडगुजर सर, सुनील चौधरी सर, अर्जुन इंगळे सर, रवींद्र बोरसे सर, सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी- विद्यार्थिनी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.







