
महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता तायडे यांची घोषणा; इच्छुकांना मुलाखतीसाठी हजर राहण्याचे आवाहन
शहर प्रतिनिधी ..
आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच आता ‘स्वराज्य शक्ती सेने’ ने देखील निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, आगामी महापालिका निवडणूक ही पूर्ण ताकदीनिशी आणि ‘स्वबळावर’ लढणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांचे प्रश्न, शहराचा विकास आणि पारदर्शक कारभार या प्रमुख मुद्द्यांवर पक्ष मतदारांसमोर जाणार आहे. पक्षाच्या प्रमुख मा. सौ करुणा ताई धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाईल. या निवडणुकीत तळागाळातील कार्यकर्त्यांना आणि जनसामान्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या नवीन चेहऱ्यांना पक्षातर्फे संधी दिली जाणार असल्याची माहिती पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता संजय तायडे यांनी दिली.
मुलाखतींचे आयोजन:
पक्षाच्या वतीने लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे. मा. करुणा ताई मुंडे स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असणार आहेत. ज्या समाजसेवकांना, कार्यकर्त्यांना किंवा प्रतिष्ठित नागरिकांना स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून ही निवडणूक लढवायची आहे, त्यांनी पक्षाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांनी गोविंदा रिक्षा स्टॉप, नयनतारा मॉल समोर, विश्वकर्मा अपार्टमेंट (बेसमेंट) येथील कार्यालयात किंवा ८५३०४८८२०३ (8530488203) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता तायडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.







