
अहिल्यानगर:-(प्रशांत बाफना) नवचैतन्य सामाजिक संस्था चिखली,पुणे यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. शहरातील ज्येष्ठ पत्रकार गोकुळ पवार यांना आदर्श पत्रकारिता समाजभूषण पुरस्काराने मंगळवार दि.9 डिसेंबर रोजी निगडी प्राधिकरण येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून पिंपरी-चिंचवड येथील जैन कॉन्फरन्सचे प्रा.अशोक कुमारजी पगारीया हे तर उदघाटक म्हणून ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्लीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा विमलताई सुदर्शनजी बाफना होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील युवा उद्योजक निखील नहार,जैन कॉन्फरन्स पंचम झोनचे माजी प्रांतीय अध्यक्ष सुनिल बाफना,चिखली येथील बंधुताचार्य प्रकाश रोकडे आणि पुणे येथील प्रसिद्ध निवेदक तथा युवा वक्ते प्रा.सुनिल धनगर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात कथ्थक नर्तिका विशारद देवयानी फुटाणे यांच्या गणेश वंदनाने झाली.त्यानंतर कविता भळगट,सुवर्णा नहार,साधना टाटीया व छाया लोढा यांनी नवकार महामंत्र सादर करून मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले.नवचैतन्य सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अनिताजी नहार यांनी प्रास्ताविक केले.या वेळी त्यांनी संस्थेने केलेल्या तीन वर्षातील कार्याची माहिती दिली.समाजासाठी एकल पालक योजना व चालते फिरते विरंगुळा केंद्र असे उपक्रम भविष्यात राबविणार असल्याचे सांगितले.एकल पालक योजनेच्या अध्यक्षा मंजू संचेती यांनी एकल पालक योजनेची सविस्तर माहिती दिली.त्यानंतर या दोन्ही उपक्रमांचे उदघाटन विमल बाफना यांच्या हस्ते करण्यात आले.शिवाय एकल पालक योजनेतील तीन जिल्ह्यांतील आठ साधार्मिक मुला-मुलींना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.ज्या मध्ये पुणे येथील प्रा.सुनिलजी धनगर यांना युवा वक्ता खान्देश रत्न पुरस्कार,श्रीमती कांचनबाई मोहनजी हिवरे यांना मानसमाता पुरस्कार,जुनी सांगवी येथील सौ.पद्माबाई शशिकांतजी मुथा यांना वात्सल्य मुर्ती मानसमाता पुरस्कार,पूना निवासी सौ.विमलताई बाफना यांना समाजभूषण पुरस्कार,चिखली येथील बंधुताचार्य प्रकाशजी रोकडे व सौ.मंदाकिनी रोकडे यांना अशी हि एक झुंज समाजरत्न पुरस्कार,पुणे येथील जैन संदेश मासिकाचे संपादक तथा प्रकाशक पत्रकार सुभाष बाबू लुंकड यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार,शिरूर कासार येथील पत्रकार गोकुळ पवार यांना आदर्श पत्रकार समाजभूषण पुरस्कार,निगडी प्राधिकरण येथील सुर्यकांतजी मुथियान यांना रक्षक मी पर्यावरणाचा समाज रत्न पुरस्कार व चाकण येथील जैन कॉन्फरन्सचे चतुर्थ झोनचे प्रांतीय महिला अध्यक्षा कल्पना कर्नावट यांना समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शुभांगी कात्रेला यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिता नहार,मंजुजी संचेती,कार्याध्यक्ष साधना टाटीया,उपाध्यक्ष सुनिताजी बोरा,सचिव कविता भळगट,सचिव संजयजी छाजेड आणि विश्वस्त म्हणून नितलजी फुलपगर,कल्पना शिंगवी,तिलोका डागळीया,सुवर्णा नहार,छाया लोढा,आशा खिंवसरा व त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले







