
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.१२ डिसें. २०२५ रोजी साकळी ग्रामपंचायत तर्फे गावातील दिव्यांग बांधवांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य खतीब तडवी,परमानंद बडगुजर, फक्रोद्दीनखान कुरेशी,नरेंद्र मराठे,शेख अकबर यांचेसह पदाधिकारी व नागरिक,ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.यावेळी माजी ग्रा.पं.सदस्य राजू सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.या ओळखपत्रांमुळे दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध लाभ घेण्यासाठी सोयीचे होणार आहे.गावातील दिव्यांग बांधवांना समाजासोबत उभे राहण्यासाठी ग्रामपंचायती तर्फे दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना नवी उभारी देत आहे. दिव्यांग बांधवांना ओळखपत्र देणारी साकळी ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.







