
(प्रतिनिधी:अमोल खरात)
जामनेर:तालुक्यातील गारखेडा गावाजवळ सिमेंट मिक्सर ट्रक ची पॅजो रिक्षा ची समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे मोठा भीषण अपघात घडला.
त्यात दोन जणांचा जागीच मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले आहे. सिमेंट मिक्सर ट्रकने रिक्षाला धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघातात निकिता गोपाल निंबाळकर (रा.चिंचखेडा वय २१वर्ष) प्रमोद श्रीराम गुरुभैया (रा.तळेगाव वय ३२वर्ष) हे दोघं जागीच मृत झाले आहे.
तर,अपघातात जखमी झाल्यांची नावे.जयेश गोपाल निंबाळकर, संगीता गोपाल निंबाळकर(वय ३९) योगेश विठ्ठल गायकवाड(वय४५रा. चिंचखेडा) रेखा विलास कापडे(वय५०रा. छ,संभाजीनगर)अकलेश कुमार(वय५० उत्तर प्रदेश)संगीता सुभाष चौधरी(वय५०रा.छ,संभाजीनगर)
कुटुंब हा भुसावळ येथे नातेवाईकाकडे लग्नासाठी गेला असता ते घराकडे(चिंचखेडा)येथे परत येत असतांना एकाच पॅजो रिक्षातून आठ ते दहा जण प्रवास करत होते. गारखेडा गावाजवळ सिमेंट मिक्सर ट्रकची समोरून वेगात येत रिक्षाला जोरदार धडक लागल्यामुळे हा अपघात घडला आहे.या अपघातात मृत निकिता निंबाळकर ह्या तरुणीचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला असून तिचे लग्न एका महिन्यापूर्वी ठरले होते.निंबाळकर परिवारावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालय जळगाव येथे हलवण्यात आले आहे.
जामनेर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







