महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा या विषयावर विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले परंतु जळगाव शहरांमध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांना उत्तम प्रकारे मराठी भाषा येते त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव यांच्याकडून जिल्हाधिकारी महोदय श्री आयुष प्रसाद साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच जळगाव शहरात व जळगाव जिल्ह्यात जे हिंदी भाषिक साहित्यिक गायक कलाकार तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी हे उत्तम मराठी बोलतात यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सत्कार केला जाईल असे मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सत्कार करतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळेले, उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, सतीश सैंदाणे, दीपक राठोड, विकास पाथरे, ॲड. सागर शिंपी, महिला सेना अनिता कापुरे, लक्ष्मी भिल, लताबाई पाथरवड, नजमा तडवी, तसेच पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.