
अहिल्यानगर (प्रशांत बाफना):- नगर तालुक्यातील पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर १०२८/२०२५ भा.दं.वि. १३७(२) दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी हीस रात्री आरोपी नामे प्रतीक संजय मुरमकर (रा. आष्टी, जिल्हा बीड) याने लग्नाचे आमिष दाखवून झायलो गाडीतून पळून नेले होते.घटनेनंतर आरोपीने प्रथम अल्पवयीन मुलीच्या घरापासून गाडीतून पळवून नेऊन येथील टोल नाक्याच्या कॅमेऱ्यामध्ये गाडी दिसू नये म्हणून सदरील झायलो गाडी ही राहुरी येथील नातेवाईकांकडे लावली. त्यानंतर त्याने आपला पुढील प्रवास कोल्हापूरमार्गे थेट गोव्याकडे केला.गोवा येथे तो एका मित्राच्या मदतीने खोली घेऊन राहू लागला. दरम्यान, आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेण्यात आला आणि त्याच्या हालचालींचा बारकाईने मागोवा घेत पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार आबासाहेब झावरे, नितीन शिंदे, राजू खेडकर, सचिन मस्के तसेच दक्षिण मोबाईल सेल विभागाचे अंमलदार राहुल गुंडू यांनी ही कारवाई केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करीत आहेत.पोलीस पथकाने आरोपीस जेरबंद करून अल्पवयीन मुलगी सुरक्षितरित्या परत मिळविण्यात मोठे यश मिळविले असून या संपूर्ण कारवाईत नगर तालुका पोलिसांनी निर्णायक आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नगर तालुका पोलिसांच्या या वेगवान, तांत्रिक आणि प्रभावी तपासाची सर्वत्र प्रशंसा होत आहे







