Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अन्यथा असंसैधानिक उपमुख्यमंत्रिपद काढून टाका, खात्याच्या नावाने मंत्री ओळखला पाहिजे- उद्धव ठाकरे

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 12, 2025
in राजकीय
0

नागपूर: प्रशांत बाफना हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधार्‍यांना वेगवेगळ्या मुद्दयांवरून कोंडीत पकडत आहेत. लाडकी बहीण, बिबट्यांचा उच्छात, शेतकरी कर्जमाफी याबाबत विरोधक सत्ताधार्‍यांना जाब विचारताना दिसत आहेत. याच हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील नागपूरात पोहोचले आहेत. विधिमंडळाच्या कामकाजात ते सहभागी होणार आहेत. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधार्‍यांवर गंभीर आरोप केले आहेत. सोबतच विरोधी पक्षनेतेपदाच्या नेमणुकीवर बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा उल्लेख करून एका प्रकारे एकनाथ शिंदे यांनाच डिवचलं आहे. उपमुख्यमंत्री पदाला काही महत्व नाही, असं ठाकरे म्हणाले आहेत.

सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विरोधकांनी या पदासाठी भास्कर जाधव यांच्या रुपात नाव सुचवलेलं आहे. परंतु अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हाच मुद्दा अधोरेखित करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी मी म्हटलं होतं की विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा सांगितला होता. भास्कर जाधव यांचं नावही सूचवलं आहे. पण उत्तर आलं नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच नियम असला काय नसला तरी दोन, दोन उपमुख्यमंत्रिपदं तयार केली जातात. मग विरोधी पक्षनेतेपद द्यायला घाबरता का? असा सवालाही ठाकरेंनी केला.

मुख्यमंत्रीपदही काढून टाका

तुमचे सरकार मजबुत आहे. तुमचे 200 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या आहेत. तुमच्या सरकारला केंद्र सरकारचाही आशीर्वाद आहे. तरीही विरोधी पक्षनेतेपद का दिले जात नाही. तुम्ही एवढे कशाला घाबराता, असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरेंनी सत्ताधार्‍यांना केले. विरोधी पक्षनेतेपद दिले जात नसेल तर मग असंवैधानिक असलेले उपमुख्यमंत्रिपदही काढून टाका. त्या त्या खात्याच्या नावाने मंत्री ओळखला गेला पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपच्या नेत्यांनीच सांगितलं आहे की नबंर एकलाच महत्व असतं. नंबर दोनचं महत्व नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. दरम्यान उद्धव ठाकरे यांची ही टोलेबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याला आता एकनाथ शिंदे काय उत्तर देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

Previous Post

🌹 निधन वार्ता 🌹

Next Post

उद्धव ठाकरेंनी भाजपचा डाव उधळला!

Next Post

उद्धव ठाकरेंनी भाजपचा डाव उधळला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..