
कल्याण प्रतिनिधी-कल्याण तालुक्यातील मोहने-आंबिवली येथील संत सेवालाल महाराज व माता जगदंबा देवी मंदिर येथे दत्त जयंतीनिमीत्त व पौर्णिमेचे औचित्य साधून दर महिन्याप्रमाणे संत सेवालाल महाराज यांना भोग लावण्यात आला व अरदास बोलून पुजा करण्यात आली.
यावेळी,बंजारा समाजाला हैद्राबाद गॕझेटनुसार अनुसूचीत जमाती(ST) प्रवर्गामधे आरक्षण मिळावे यासाठी चाळीसगांव तालुक्यातील परशुराम नगर(दडपिंप्री) या गावातील बंजारा समाजाचे समाजसेवक तथा बंजारा संघर्ष योद्धा,पत्रकार-सतिषभाऊ राठोड यांचा मोहने-आंबिवली येथील समस्त बंजारा समाजबांधव आणि मंदिर समितीच्या वतीने शाल,श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी संत सेवालाल महाराज बंजारा व लभाना समाज तांडा समृद्धी योजनेचे कोकण विभागीय अशासकीय सदस्य-कैलासभाऊ पवार,ठाणे जिल्हा अशासकीय सदस्य-कैलासभाऊ तंवर,जिल्हा सदस्या-सुमित्राताई जाधव,ॲड.गजाननजी जाधवसाहेब,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,समाजसेवक-डॉ.युवराजभाऊ राठोड,गोरमाटी वाते या चॕनेल चे संपादक-करसनभाऊ राठोड,उत्तम राठोडसाहेब(पो.निरीक्षक),बंजारा समाज सेवा संस्स्थेचे संचालक तथा मंदिराचे पुजारी-विठ्ठलभाऊ राठोड,विक्रमभाऊ चव्हाण,सुरेशभाऊ नाईक,सोमला राठोड,किसन पवार,समाजसेवक-अनिलभाऊ राठोड,केवलसिंग जाधव,विजयभाऊ पवार,देवराम राठोड,चंद्रकांत नाईक यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी मंदिर परिसरामधे संत सेवालाल महाराज आणि माता जगदंबा देवी की जय असा जयजयकार करण्यात आला व त्यानंतर सत्कारमुर्ती तथा पत्रकार-सतिषभाऊ राठोड यांनी समाजाने केलेल्या सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले आणि सांगितले की,आजपर्यंत मी जेही कार्य हातामधे घेतले आहे त्यास समाजाचा खूप प्रतिसाद मिळाला असून यामधे माझ्या परशुराम नगर(दडपिंप्री) गावातील सर्व नागरिक बंधू-भगिनींचा मी धन्यवाद मानतो आणि मोहने-आंबिवली शहरातील सर्व समाजबांधव यांनी जो माझा सत्कार केला त्याबद्दल देखील मी समाजाचा नेहमीच आभारी राहील.







