पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
पुणे लष्कर परिसरात स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत बांधकाम व्यावसायिक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी व मृत कामगार आणि जखमींना भरपाई मिळावी यासाठी राष्ट्रवादी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेच्या वतीने पुणे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांना निवेदन,
पुणे लष्कर परिसराततील साचापिर स्ट्रीट वरील इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत मृत व जखमी मजुरांना बांधकाम व्यावसायिका कडून भरपाई द्यावी तसेच बांधकाम व्यावसायिक व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने अध्यक्ष नरेश इंद्रसेन जाधव यांनी पुणे लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांना निवेदनाद्वारे देण्यात आले,
यावेळी कॅन्टोन्मेंट कार्याध्यक्ष राहुल तांबे, ब्लॉक अध्यक्ष दिनेश अर्धाळकर, पुणे कॅन्टोन्मेंट महिला अध्यक्षा नीता गायकवाड, अनिल अग्रवाल, उमेश परदेशी, नीलम लालबिगे, रोशन आप्पा कुरेशी, हरीश लडकत, दिनेश परदेशी, महेंद्र लालबिगे, शब्बीर भाई शेख, अतुल जाधव, नुरजहा शेख, हिना शेख, अब्बास शेख, आदि यावेळी उपस्थित होते,