Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

केडगावमध्ये बिबट्या? वनविभागाकडूून शोध मोहीम, पिंजरा लावण्याची तयारी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 6, 2025
in शासकीय
0

अहिल्यानगर / प्रशांत बाफना
केडगाव उपनगरातील हजारे मळा परिसरात बिबट्यासदृश्य प्राणी असून, वनविभागाकडून याठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

केडगावमधील शाहूनगर पसिरातील बायपास जवळ शेतकऱ्यांची शेती आहे. हजारे मळा याठिकाणी सकाळी पप्पू हजारे हे शेतातील ऊस तोडत होते. त्यांचा पाळीव कुत्रा हा उसाच्या शेतात शिरला अन्‌‍ जीव वाचविण्याच्या भितीने अचानक बाहेर भुंकत जोरात पळत आला. त्यामुळे हजारे घाबरले. ऊसाच्या आतमध्ये बिबट्या असल्याचा संशय आल्याने ते तेथून घाबरून निघून आले. याची माहिती त्यांनी स्थानिक नागरिकांसह नगरसेवक अमोल येवले यांना दिली.

येवले यांनी तातडीने वनविभागाला माहिती कळविली. वनविभागाचे कर्मचारी सकाळी या भागात आले. यावेळी नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. हजारे मळा भागात ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यातून या भागात बिबट्या आहे की नाही, हे समजणार आहे. वनविभागाकडून खबरदारी म्हणून या भागात पिंजरा लवण्यात येणार आहे. दुसरीकडे केडगावात बिबट्या आल्याची माहिती समजताच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

कामरगाव येथे लावले पिंजरे
अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव येथे विठ्ठलवाडी परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी पिंजरे बसविण्याची मागणी केली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष (अजित पवार गट) सिद्धांत आंधळे यांनी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली. त्यांनी त्याची दखल घेऊन डी.पी.डी.सी. अंतर्गत वनविभागाला तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार कामरगाव येथील विठ्ठलवाडी परिसरात अत्याधुनिक पिंजरा तातडीने बसविला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धांत आंधळे, मा.सरपंच तुकाराम कातोरे, आदिनाथ आंधळे, वनकर्मचारी सखाराम येणारे, वनरक्षक कृष्णा गायकवाड, योगेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Previous Post

नगरच्या रेल्वे प्रकल्पांना गती द्या ; खासदार नीलेश लंके यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

Next Post

जगन्नाथ सकट समाज सेवाभावी संस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,

Next Post

जगन्नाथ सकट समाज सेवाभावी संस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..