जिल्हा प्रतिनिधी मन्सूर तडवी
यावल दि. १/७/२५ रोजी वकील संघाची बैठक होऊन सदरील बैठकीत नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली त्यात सर्वानुमते अध्यक्षपदी ॲड. शामकांत जी. कवडी वाले व सचिव पदी ॲड.शेखर सुजात तडवी राहणार इच खेडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली व तसा सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला शेखर तडवी हे मूळचे रा. चिचखेडा तालुका यावल येथील सोयंके परिवारातील आहेत सन २०१५ ते २०२० पाच वर्ष त्यांनी L L B व L L M विधी पदवी मिळवली त्यानंतर जिल्हा न्यायालय जळगाव येथे दिवाणी व फौजदारी क्षेत्रात प्रॅक्टिस केली त्यानंतर इचखेडा येथून किनगाव येथे त्यांचे ऑफिस वकील कार्यालय ओपन करण्यात आले त्यावेळी दिवाणी फौजदारी न्यायालयात यावल येथे कुटुंबिक केसेस किरकोळ खटले व वहिवाट शेतीविषयक दावे इत्यादी केसेस त्यांनी कामे केलेत व आत्ता स्वतः केसेस लढत आहेत व त्यांचे सध्या भुसावळ जळगाव चोपडा धुळे पुणे आणि शिरपूर कोर्टात सध्या केसेस सुरू आहेत त्यांच्याकडे आता दिवाणी दावे शेती विषयी व शेत वहिवाट विषयक दावे जास्त प्रमाणात आहेत शेखर तडवी यांनी एका लहानश्या खेडेगावातून शिक्षण घेऊन आई-वडील यांचे स्वप्न पूर्ण केले शेखर तडवी हे शांत स्वभावाचे मनमिळाऊ स्वभाव चे असून त्यांच्या या नियुक्तीवरून परिसरात व समाजात त्यांच्यावर शुभेच्छांच वर्षा होत आहे