Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अन्यथा आमचा एक एक पदाधिकारी आत्मदहन करेल – करूणा मुंडे

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 5, 2025
in ताज्या बातम्या
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
: नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा राज्यभरात चांगलाच गाजत आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक येथील तपोवनात असलेले 1700 वर वृक्ष तोडण्यात येणार आहेत. मात्र याला पर्यावरणप्रेमी आणि विविध समाजिक संस्थांकडून जोरदार विरोध होत आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील या मोहिमेला पाठिंबा देत वृक्षतोडीला विरोध केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच तापलं आहे, या प्रकरणात अंजली दमानिया यांच्यानंतर आता करुणा मुंडे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी तपोवनला भेट दिली. आम्ही या वृक्षतोडीचा तीव्र निषेध करतो, धर्माच्या नावाखाली व्यापार करू नका. साधू-संतांना सिमेंट – काँक्रीटमध्ये बांधून ठेवू नका. तपस्या भंग करू नका. निसर्गाशी खेळलात तर भोग भोगावे लागतील, असं यावेळी करूणा मुंडे म्हणाल्या.

पुढे बोलताना करूणा मुंडे म्हणाल्या की, आज मी तपोवनला आले आहे, झाडे कापण्याचे दुष्कर्म सुरू आहे. संत तुकाराम महाराज म्हणायचे वृक्ष वल्ली आम्हा सोयरे,पण देवा भाऊंचे सगेसोयरे आदानी- अंबानी आहेत, पण त्यासाठी वृक्ष कापून मार्ग मोकळा करायचा का? असा टोला यावेळी करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना लगावला आहे. आम्ही या वृक्षतोडीचा तीव्र निषेध करतो, शंकराचार्यांनही सांगितले वृक्ष कापण्याची गरज नाही. एक वृक्ष कापला तर आमचा एक-एक पदाधिकारी आत्मदहन करेल असा इशाराच यावेळी करूणा मुंडे यांनी दिला आहे.

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वृक्ष आमचे नातेवाईक. आपले शरीर पाच तत्वांपासून बनले आहे, निसर्गाशी नाते घट्ट आहे. निसर्गाला धक्का लावू नका. राजकारणी लोक राजकारण करतीलच. हा मुद्दा हिंदू- अहिंदू किंवा धर्माचा नाही, हा निसर्गाचा प्रश्न आहे. त्यासाठी ट्विट करायची गरज नाही, कृती करा. झाडे कापण्याचा प्रयत्न म्हणजे खून करण्याचा प्रयत्न. झाडे कापण्याचे पाप करू नका. नाहीतर आमचा एक एक पदाधिकारी आत्मदहन करेल. असं यावेळी करुणा मुंडे म्हणाल्या

Previous Post

नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरण; नाशिकमधील पर्यावरण प्रेमी संतापले नितेश राणेंना बकरी आणि वृक्षामधला फरक कळतो का?

Next Post

जामनेर येथे सोना पेट्रोल पंप समोरील अंबिका ॲटो गॅरेज ला भिषण आग.!आग्नीशामण दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणली.

Next Post

जामनेर येथे सोना पेट्रोल पंप समोरील अंबिका ॲटो गॅरेज ला भिषण आग.!आग्नीशामण दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026

एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक?

March 1, 2026

दुसखेडा रेल्वे स्टेशनजवळील आंबेडकर नगरकडे दुर्लक्ष? डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या सभागृहाची दुरवस्था; आमदारांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..