
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल नगरपरिषद निवडणुकीत आज मतदारांनी अक्षरशः उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लावल्या. शहरातील वातावरण सकाळपासूनच उत्साहाने तापलेले, मतदान केंद्राबाहेर पुरुष-महिला-युवकांची लगबग आणि ‘बदल हवा’च्या घोषणा… पण या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर एकच मोठा प्रश्न शहरात धगधगत आहे—निकालाअंती खरंच विजय कोणाचा? धनशक्तीचा की जनशक्तीचा?

मतदारांनी लोकशाहीचा हक्क बजावताना स्पष्ट संदेश दिला—
“आम्ही मतदान केलेय मनाने, पण यावेळी पैशांची उधळण, बाहेरून चालवलेले राजकीय खेळ आणि मतदारांना खरेदी करण्याचे प्रयत्न आम्ही ओळखलेत!”
शहरात चर्चांना उधाण—
काही उमेदवारांचे पैशांचे गठ्ठे फिरवण्याचे ‘गुपित’ खुलेआम चर्चेत
तर काही प्रखर जनआधारावर उभे असलेले उमेदवार मनाने मतदार जिंकत असल्याचे दृश्य
मतदारांमध्ये प्रचंड नाराजी – “आम्हाला पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता शह देण्याची वेळ आलीय!”
मतदान केंद्राबाहेर मतदारांचे थेट विधान—
“आम्ही मत टाकलंय पैशावर नाही… कामावर, स्वच्छतेवर, विकासावर. आता निकालात दिसलं पाहिजे जनतेचं सामर्थ्य!”
या निवडणुकीत प्रथमच दोन फ्रंट निर्माण झाले—
धनशक्ती
– पैशाचा पाण्यासारखा ओघ
– बाहेरच्या मोठ्या राजकीय नेत्यांची हस्तक्षेप
– मतदारांना आकर्षित करण्याचे सर्व मार्ग वापरल्याची चर्चा
जनशक्ती
– घराघरात फिरून मतदारांचा विश्वास जिंकणारे उमेदवार
– जनतेच्या भावना, तक्रारी, अपेक्षा यांना प्राधान्य
– पैशाच्या ताकदीला न जुमानता पारदर्शकतेने लढा देणारे गट
आता सर्वांचे डोळे मतमोजणीवर खिळले आहेत.
मतदारांच्या उत्साहाने लोकशाहीचा झेंडा उंचावला, पण निकालात जोरदार लढत होणार—धनशक्तीचा माज कोसळणार की जनशक्तीचा उदय होणार?
यावल शहरात एकच चर्चा—
“या वेळी जनता जागी झालीय… आणि जागी जनता कोणालाही हरवू शकते!”
निकालानंतर राजकारणात मोठे स्फोटक घडू शकतात, अशी कुजबुजही सुरु.
आता बघायचं—यावलचा तख्त पैसा जिंकणार की जनता?







