उरुळी कांचन: सामाजिक, धार्मिक ,वैद्यकीय, निराधार सेवा, आध्यात्मिक क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणारे डॉ. रवींद्र भोळे यांचे विविध क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे. ज्ञान विज्ञानाला अध्यात्माची जोड हवी. या तत्त्वाला अनुसरून डॉ. रवींद्र भोळे निरपेक्षपणे विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करीत आहेत, असे मत दैनिक सकाळच्या प्रतिनिधी पूर्व हवेली प्रमुख सुवर्णा कांचन यांनी येथे व्यक्त केले. राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने येथील ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, अपंग सेवक ह .भ .प .डॉ.रवींद्र भोळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वरील मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी महंत गोपाळ व्यास कपाटे अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी शिवसेना हवेली म्हणाले की डॉ. रवींद्र भोळे महाराज यांनी कोरोना महामारीत रात्रंदिवस अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा केलेली आहे. मराठवाडा भूकंपातत्यांनी महत्त्वपूर्ण वैद्यकीय, सामाजिक योगदान दिलेले आहे. डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या माध्यमातून गरीब, दुर्बल घटकांना धर्मदाय वैद्यकीय सेवा देत आहेत. कर्मफलाची अपेक्षा न ठेवता ते निष्कामकर्मयोग साधत आहेत.गेली 35 वर्षे पासून समर्पित भावनेने विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत.महाराष्ट्रातील समर्पित ,निष्काम कर्मयोगाचे ते एक मूर्तीमंत उदाहरण आहेत, सामाजिक कार्याबद्दल त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी दैनिक केसरीचे पत्रकार अमोल भोसले, ज्येष्ठ पत्रकार सुनील तुपे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.