Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जनतेचा आधारवड हरपला; दिलीपराव लांडे पाटील यांचे निधन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 29, 2026
in निधन वार्ता
0

जनतेचा आधारवड हरपला; दिलीपराव लांडे पाटील यांचे २८ एप्रिल रोजी पहाटे निधन झाले.
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
शेवगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार व शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटविणारे ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे पाटील यांचे पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्याने अभ्यासू, धाडसी व जनतेसाठी झटणारे नेतृत्व गमावले असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

दिलीपराव लांडे पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली होती. राष्ट्रवादी विचारसरणीशी निगडित राहून त्यांनी प्रभावी भाषणशैली, स्पष्ट विचार आणि जनतेच्या प्रश्नांवरील ठोस भूमिका यामुळे जनमानसात स्थान मिळवले. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. ते केवळ राजकारणी नसून लोकांच्या भावना जाणणारे जननेते म्हणून ओळखले जात होते.

शेतकरी, युवक, अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली विशेष होती. जायकवाडी धरण पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष करत आधार दिला. ग्रामीण भागातील विकासकामांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका बजावत सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य केले.

जोहऱापूर येथून त्यांनी शून्यातून राजकारणाची सुरुवात केली. लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम करत घुले घराण्याच्या राजकीय बळकटीत मोलाचा वाटा उचलला. विविध निवडणुकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण रणनीती आखून यश मिळवून दिले.

दिलीपराव लांडे पाटील हे पंचायत समिती शेवगावचे सभापती म्हणून कार्यरत होते. तसेच जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन विभागाचे सभापती म्हणून त्यांनी पाच वर्षे काम पाहिले. त्यांच्या पश्चात मीराताई दिलीपराव लांडे यांनीही त्याच पदावर कार्य केले.

त्यांच्या निधनाने शेवगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कार्य, नेतृत्व आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी कायम प्रेरणादायी राहील

Previous Post

यावल तालुक्यातील रस्ते कामांवर संतापाचा स्फोट! सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद विभागावर गंभीर आरोप

Next Post

राज्यावर दुहेरी संकट; कडक उन्हाळ्यात अवकाळीचा इशारा, अहिल्यानगरमध्ये उन्हाचा तडाखा…

Next Post

राज्यावर दुहेरी संकट; कडक उन्हाळ्यात अवकाळीचा इशारा, अहिल्यानगरमध्ये उन्हाचा तडाखा…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्तमराव यशवंत पंडित यांचे निधन

April 29, 2026

राज्यावर दुहेरी संकट; कडक उन्हाळ्यात अवकाळीचा इशारा, अहिल्यानगरमध्ये उन्हाचा तडाखा…

April 29, 2026

जनतेचा आधारवड हरपला; दिलीपराव लांडे पाटील यांचे निधन

April 29, 2026

यावल तालुक्यातील रस्ते कामांवर संतापाचा स्फोट! सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद विभागावर गंभीर आरोप

April 29, 2026

गरीब कार्यकर्त्यांना न्याय द्या; विधानपरिषदेत संधी देण्याची जोरदार मागणी!

April 29, 2026

खा. नीलेश लंके यांचा डॉ. सुजय विखे यांच्यावर पलटवार ;राजकीय खेळी समजली म्हणूनच खासदार झालो!

April 28, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..