पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
रिपब्लिकन चर्मकार महासंघ ही संघटना दलित, वंचित, उपेक्षित, गोरगरीब नागरिकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून अनेक आंदोलन, मोर्चा केली आहे ही संघटना अजून मजबूत होण्यासाठी मुंबई येथे मुक्ताई बंगले मध्ये पक्षप्रवेश सोहळा मध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांनी मोठ शक्ती प्रदर्शन करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती हाती घेतला धनुष्यबाण व शिवसेनेत प्रवेश केलाय,
आगामी काळामध्ये होत असलेल्या निवडणुकीत रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड ते संभाव्य उमेदवार असल्याचे चर्चा आहे, यावेळी संघटनेचे खजिनदार सुनील राठी, महाराष्ट्र प्रदेश मुख्य सचिव सुनील गायकवाड, मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय शेवकर, मुंबई प्रदेश सचिव बळीराम कांबळे, मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष विजय शिंगणे, मुंबई महिला प्रदेश अध्यक्ष गंगोत्री साळुंखे, पुणे जिल्हा अध्यक्ष गटई कामगार सुनील चराटे, उमेश सराटे, संजय ब्राह्मणे, अजय जोरे, बंडू पुरुषोत्तम, रवींद्र शिराळे, मनीषा कांबळे, यांच्यासहित मोठ्या संख्येमध्ये चर्मकार बांधव माता भगिनी उपस्थित होते,