
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
यावल शहरात आगामी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगत चालली असताना, महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल पाटील यांनी विकासाचा नारा देत प्रचाराचे वारे जोरात पेटवले आहेत. “यावलचा सर्वांगीण विकास — आमची प्रामाणिक बांधिलकी” हा त्यांचा नारा नागरिकांच्या मनाला भिडताना दिसत आहे.
महाविकास आघाडी व शिवसेना (उबाठा) यांच्या सामंजस्याने अतुल पाटील यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, शहरातील महिला राखीव नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या पत्नी सौ. छायाताई पाटील यांचे नामांकन सुद्धा दमदार पद्धतीने दाखल झाले आहे. शहरात या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी पदयात्रा, कोपरा सभा, नागरिकांशी संवाद यामुळे वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.
अतुल पाटील यांनी आपल्या मतदारांना दिलेल्या संदेशात स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की,
“विकास हा आमचा मुख्य अजेंडा आहे. आम्ही केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा आणि भविष्यातील नियोजन यामुळे यावलचा चेहरा बदलणार आहे.”
त्यांच्या कार्यकाळात राबवलेल्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सार्वजनिक गरजांच्या प्रकल्पांचा नागरिकांकडून सकारात्मक उल्लेख होताना दिसत आहे.
छायाताई पाटील यांच्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह असून, महिलांमध्येही त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. स्थानिक राजकीय परीसरानुसार, “विकासाच्या मुद्यावरून छायाताईंचा विजय जवळपास निश्चित आहे” असा अंदाज वर्तवला जात आहे.
यावलमध्ये सध्या महाविकास आघाडीचा “विकासवाद” हा संदेश वेगाने पसरण्यास सुरुवात झाली असून, शहरातील तरुण, महिला आणि व्यावसायिक वर्ग या प्रचाराला जोरदार प्रतिसाद देत आहेत. येत्या काही दिवसांत प्रचार अधिक आक्रमक आणि आकर्षक होण्याची चिन्हे दिसत असून, यावलच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा मुख्य ठरणार हे स्पष्ट झाले आहे.
यावलच्या प्रगतीसाठी, नवा विचार — नवा नेतृत्व!
अतुल पाटील यांची उमेदवारी शहरवासीयांमध्ये नवा आशावाद निर्माण करत आहे.







