Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कंटाळवाणं लोडशेडिंग…! सायंकाळी होतोय डासांचं प्रचंड सुळसुळाट…! सकाळच्याऐवजी संध्याकाळी वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी…!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 26, 2026
in शासकीय
0

अहिल्यानगर/प्रशांत बाफना
ऐन उन्हाळ्यात सगळीकडे डासांचा प्रचंड सुळसुळाट झाला असतानाच संध्याकाळी सहा वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद असतो. महावितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे प्रशांत असं कंटाळवाणं लोडशेडींग करण्यात आलं असल्यामुळं यामध्ये बदल करण्यात यावा. सकाळच्याऐवजी संध्याकाळी सिंगल फेजचा वीज पुरवठा सुरु करण्याची मागणी ग्रामीण भागांतून केली जात आहे. 

उन्हाळ्यात डासांचं प्रमाण प्रचंड वाढत असतं. त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत डास माणसांना बसूसुद्धा देत नाहीत. त्यामुळे महावितरणच्या या अत्यंत चुकीच्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थ झाले प्रचंड संतप्त झाले आहेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सकाळचा पुरवठा बंद करुन संध्याकाळी किमान सात ते नऊ वाजेपर्यंत सिंगल फेजचा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा, अशी ग्रामीण भागातल्या अनेकांची मागणी आहे.

सोनई – कांगोणी रस्त्यालगतच्या शेटे पाटील वस्तीसह अनेक ठिकाणी महावितरणच्या गलथान कारभारामुळे संध्याकाळी सहा ते रात्री दहावाजेपर्यंत अंधार असतो. या अंधाराबरोबरच डासांचा सुळसुळाट झाला असून रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा बंद असल्यामुळे लहान मुलांसह वयोवृद्ध माणसांपर्यंत डास चावत असल्यामुळे आजाराचं प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, ग्रामीण भागांत अनेकजण वीजेच्या शेगड्या वापरत असल्यामुळे कदाचित वीजपुरवठ्यामध्ये बदल करण्यात आल्याचं बोललं जात आहे. परंतु अनेकजण सकाळी उशिरापर्यंत विजेच्या शेगड्याचा वापर करत आहेत. त्यामुळे सकाळच्या ऐवजी संध्याकाळी उशिरापर्यंत सिंगल फेजद्वारे वीज पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.

सोनई महावितरणच्या अधिकाऱ्यांची हतबलता…!

महावितरणच्या या कंटाळवाण्या लोडशेडिंगसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता असं सांगण्यात आलं, की लोडशेडिंगचं हे शेड्युल मुंबईच्या मुख्य कार्यालयातून करण्यात येतं. त्यामध्ये आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे बदल करु शकत नाही. सोनई महावितरणच्या अधिकाऱ्यांचं हे उत्तर कितपत योग्य आहे, हा मोठा गंभीर विषय आहे. वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यास असमर्थ असलेले अधिकारी या विषयासंदर्भात प्रचंड हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या अधिकाऱ्यांची ही हतबलता ग्रामस्थांच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे

Previous Post

सावदा येथील सरकारी दूध डेअरीत पोलिसांचा मोठा छापा; दुधाच्या आड सुरू असलेली दारूची तस्करी उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कंटाळवाणं लोडशेडिंग…! सायंकाळी होतोय डासांचं प्रचंड सुळसुळाट…! सकाळच्याऐवजी संध्याकाळी वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी…!

March 26, 2026

सावदा येथील सरकारी दूध डेअरीत पोलिसांचा मोठा छापा; दुधाच्या आड सुरू असलेली दारूची तस्करी उघड

March 26, 2026

किनगाव आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; दोन गरोदर मातांना एकाच बेडवर उपचार! प्रशासन झोपेत?

March 25, 2026

रावेर–यावल तालुक्यात भोंदू बाबा अशोक खरातचे ‘कनेक्शन’ ? अधिकाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत चर्चेला उधाण

March 25, 2026

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..