Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

नगरपालिकेचा नगर शहारातील कर्मचारी लाच घेताना अटक

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 22, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना –तहसील कार्यालयात ओळख असल्याचे सांगून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या राहुरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. बाबासाहेब किशोर राऊत (वय ४०, रा. बुरुडगाव रोड, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदाराचे शासकीय ‘राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य’ योजनेअंतर्गत ३० हजार मंजूर करून देण्यासाठी राऊत याने १ हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राऊत याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकाने केली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी केले आहे.

नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “सामान्य माणसाची अशी अवस्था असेल तर प्रशासन झोपेत आहे का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शासकीय कामांसाठी लाच मागितली जात असल्याच्या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून, संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे

Previous Post

अखेर कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली चाकणकरचा राजीनामा? राष्ट्रवादी उद्याच घेणार निर्णय; बोलावली तातडीची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नगरपालिकेचा नगर शहारातील कर्मचारी लाच घेताना अटक

March 22, 2026

अखेर कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली चाकणकरचा राजीनामा? राष्ट्रवादी उद्याच घेणार निर्णय; बोलावली तातडीची बैठक

March 21, 2026

साकळी येथे ऐक्याचे दर्शन! रमजान ईद निमित्त गळाभेट देत मुस्लिम बांधवांना शुभेच्छांचा वर्षाव

March 21, 2026

श्री .अरुण साहेब तनपुरे यांचा वाढदिवस शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा .

March 19, 2026

CSC घोटाळ्यामागे ‘मोठे रॅकेट’?छोट्यांवर कारवाई, मोठे अजूनही मोकाट!

March 19, 2026

मतदार यादी संदर्भात SIR जनजागृती विषयावर उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा श्री.भूषण अहिरे यांनी माहिती दिली

March 19, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..