Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अखेर कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली चाकणकरचा राजीनामा? राष्ट्रवादी उद्याच घेणार निर्णय; बोलावली तातडीची बैठक

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 21, 2026
in राजकीय
0

मुंबई/प्रशांत बाफना
राज्यात सध्या कॅप्टन खरात प्रकरण गाजत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत येताना दिसत आहेत. रुपाली चाकणकरांचे अशोक खरात यांच्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यामुळे विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण रुपाली चाकणकर यांना भोवण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार भोंदूबाबा खरात प्रकरण रुपाली चाकणकर यांना भोवणार असं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्याचीद शक्यताही आहे. उद्या यासंदर्भात राष्ट्रवादीने काँग्रेसची महत्वाची बैठक बोलावली आहे. रुपाली चाकणरक यांच्यसा संदर्भात उद्याच फैसला होऊ शकतो. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि महत्वाचे नेते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी आपण पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं आहे. “ मी मुंबईत आहे. पोलिस महासंचालकांना भेटणार आहे मी पत्रकार परिषद घेऊन जे काय आहे ते स्पष्ट करणार” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

अशोक खरात प्रकरणावर सुनिल तटकरेंची पोस्ट: अशोक खरात प्रकरणावर सुनील तटकरेंनी पोस्ट केली आहे. राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सुद्धा या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवीत ती आम्ही उचलू असं ते म्हणाले आहेत. या प्रकरणातील पीडितांनी समोर येऊन पोलिसात तक्रार नोंदवावी आवाहनही त्यांनी केलं आहे.

“ नाशिकच्या खरात प्रकरणाच्या अनुषंगाने जी काही माहिती बाहेर येते आहे, ती उद्विग्न करणारी आहे. देवाच्या आणि श्रद्धेच्या नावाने अशा काही गोष्टी होतील अशी कल्पना मी किंवा कोणीच कधीही करू शकत नाही.

सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येकाचाच अनेक व्यक्तींशी तसेच संस्थांशी संपर्क येतो. अनेकदा या संपर्काचे स्वरुप थेट स्वरुपाचे असतेच असे नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की, एखादे गुन्हेगारी कृत्य करणार्‍या व्यक्तीला पाठीशी घातले जाईल. उलट या प्रकरणातील पीडितांनी समोर येऊन पोलिसात तक्रार नोंदवावी आमचे सरकार या प्रकरणात ठाम भूमिका घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतिने सुद्धा या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवीत ती आम्ही उचलू ” सुनिल तटकरे म्हणाले.

निराज जाधव पोलिसांच्या ताब्यात : कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. नीरज जाधव नाशिक क्राईम पोलिसांच्या ताब्यात आहे. शिर्डीत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडिओचे स्क्रीन शॉट्स पाठविल्या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नीरज जाधवनेच कॅप्टन खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय आहे. 100 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ असल्याची माहिती आहे

Previous Post

साकळी येथे ऐक्याचे दर्शन! रमजान ईद निमित्त गळाभेट देत मुस्लिम बांधवांना शुभेच्छांचा वर्षाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अखेर कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली चाकणकरचा राजीनामा? राष्ट्रवादी उद्याच घेणार निर्णय; बोलावली तातडीची बैठक

March 21, 2026

साकळी येथे ऐक्याचे दर्शन! रमजान ईद निमित्त गळाभेट देत मुस्लिम बांधवांना शुभेच्छांचा वर्षाव

March 21, 2026

श्री .अरुण साहेब तनपुरे यांचा वाढदिवस शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा .

March 19, 2026

CSC घोटाळ्यामागे ‘मोठे रॅकेट’?छोट्यांवर कारवाई, मोठे अजूनही मोकाट!

March 19, 2026

मतदार यादी संदर्भात SIR जनजागृती विषयावर उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा श्री.भूषण अहिरे यांनी माहिती दिली

March 19, 2026

वैद्यकीय अधिकाऱ्यावर गंभीर तक्रार; विभागीय चौकशीचे आदेश

March 19, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..