Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

रावेर तालुक्यात गोवंश कत्तल प्रकरण उघड  पोलिसांचा पहाटे छापा, १७५ किलो गोमांस जप्त

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 10, 2026
in क्राईम
0

रावेर : रावेर तालुक्यातील रसलपूर येथील कुरेशी मोहल्ल्यात गोवंश कत्तल करून गोमांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी (दि.१० मार्च) पहाटे छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला आहे.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रसलपूर गावातील कुरेशी मोहल्ल्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याचे उघड झाले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तात्काळ कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला. यावेळी शेख युसुफ शेख अय्युब कुरेशी (वय ५०) आणि शेख सानिफ शेख युसुफ कुरेशी (वय २५) हे पिता-पुत्र गोवंश कत्तल करून गोमांस विक्री करताना आढळून आले.पोलिसांना पाहताच आरोपींनी गल्लीबोळाचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडण्यात यश मिळवले. त्यांच्याकडून सुमारे १३० किलो गोमांस (किंमत २६ हजार रुपये) व धारदार कोयता जप्त करण्यात आला.दरम्यान, तपासादरम्यान पोलिस पथकाने परिसरात आणखी शोध घेतला असता शेख नईम शेख अय्युब कुरेशी हा देखील गोवंश कत्तल करून विक्री करत असल्याचे दिसून आले. मात्र पोलिस पोहोचण्यापूर्वीच तो फरार झाला. घटनास्थळावरून २५ किलो गोमांस (किंमत ५ हजार रुपये) व धारदार कोयता जप्त करण्यात आला.या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) कलम ५, ५(ब), ५(क), ९, ९(अ), ९(ब), ११ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत एकूण ३१ हजार रुपये किमतीचे सुमारे १७५ किलो गोमांस व धारदार सुरे जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील (रावेर) यांच्या उपस्थितीत घेऊन त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.फरार आरोपीचा शोध गुन्हे शोध पथक घेत असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपअधीक्षक अनिल बडगुजर (फैजपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पो.उपनिरीक्षक मनोज महाजन तसेच कर्मचारी प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, गजानन बोने, राहुल परदेशी, शुभम काळे यांचा समावेश होता. पुढील तपास पो.हे.कॉ. सिकंदर तडवी करत आहेत.

Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय सेलच्या वतीने पद नियुक्ती पत्र वाटप व चर्चासत्र कार्यक्रम संपन्न.

Next Post

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर ;कारण आलं समोर….

Next Post

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर ;कारण आलं समोर….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर ;कारण आलं समोर….

March 10, 2026

रावेर तालुक्यात गोवंश कत्तल प्रकरण उघड  पोलिसांचा पहाटे छापा, १७५ किलो गोमांस जप्त

March 10, 2026

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय सेलच्या वतीने पद नियुक्ती पत्र वाटप व चर्चासत्र कार्यक्रम संपन्न.

March 10, 2026

विरावली विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रल्हाद पाटील यांची बिनविरोध निवड; गावात जल्लोष

March 10, 2026

साकळी ग्रामपंचायतीत ग्रामसभा फक्त कागदोपत्री?नागरिकांची दिशाभूल करून तहकूब ग्रामसभेवर सह्या घेतल्याची चर्चा; ग्रामसभेचा प्रचारच नाही!

March 10, 2026

खळबळजनक: सातपुड्याच्या कुशीत ‘भुताटकी’ शाळा? ४०० विद्यार्थी कागदावर, वर्गात मात्र शुकशुकाट!

March 10, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..