Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

भडगावात दुःखद घटना : मुलांना वाचवताना दोघांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 9, 2026
in क्राईम
0

भडगाव प्रतिनिधी शेख जावीद
भडगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात मुलांना वाचवण्यासाठी धाडसाने नदीत उतरलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे भडगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहिती नुसार नदीम खान नसीम खान (वय २७) व काफिया शरीफ पिंजारी (वय १६) हे दोघे नदीपात्रात अडकलेल्या लहान मुलांना वाचवण्यासाठी तातडीने नदीत उतरले. मात्र नदीपात्रातील खोल खड्ड्यांमुळे त्यांचा तोल जाऊन दोघेही पाण्यात बुडाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मते नदीपात्रात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे मोठ्या प्रमाणात खोल खड्डे तयार झाले आहेत. याच खड्ड्यांमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाचे अविनाश जंजाडे व प्रशांत कुंभारे, पोलिस निरीक्षक महेश शर्मा, राजू अहिरे, इकबाल शेख यांनी घटनास्थळी पाहणी केली नगरसेवक इमरान अली सय्यद यांनी पोलीस, महसूल प्रशासन व नगरपालिका यांना तातडीने सूचना दिल्या. तसेच नगरसेवक आसिमभाऊ अलीम शाह व डॉ. विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मृतांच्या कुटुंबीयांना धीर दिला.नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा येथून नदीत शोधमोहीम राबवण्यासाठी कर्मचारी पाठवले. आरोग्य विभागाचे छोटे वैद्य, अजय कंडारे तसेच पाचोरा येथील गोताखोर हुसेन दादा यांनी शोध व मदतकार्यात मोलाची भूमिका बजावली.मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांनी प्राण गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भडगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

Previous Post

मोहरद येथे उपसरपंच पदी सौ शकीला मन्सूर तडवी यांची बिनविरोध निवड

Next Post

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोट्यवधींचा घोटाळा? जळगाव जिल्ह्यात बोगस लाभार्थी दाखवून लूट रुग्णालयांच्या चौकशीची मागणी

Next Post

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोट्यवधींचा घोटाळा? जळगाव जिल्ह्यात बोगस लाभार्थी दाखवून लूट रुग्णालयांच्या चौकशीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोट्यवधींचा घोटाळा? जळगाव जिल्ह्यात बोगस लाभार्थी दाखवून लूट रुग्णालयांच्या चौकशीची मागणी

March 9, 2026

भडगावात दुःखद घटना : मुलांना वाचवताना दोघांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू.

March 9, 2026

मोहरद येथे उपसरपंच पदी सौ शकीला मन्सूर तडवी यांची बिनविरोध निवड

March 9, 2026

५० लाखांच्या विमा दाव्यासाठी बनावट अपघात?चाळीसगावात मोठा घोटाळा उघड; डॉक्टर व ४ पोलिसांवर गुन्हा

March 9, 2026

अंतराळ शास्त्रज्ञ सुनिता विल्यम यांचे हुबेहूब व्यक्तिचित्र

March 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड! लाईट-पाणी नाही, डॉक्टर नाहीत… तरी ९ कर्मचाऱ्यांचे पगार सुरू; लोकप्रतिनिधींचे मौन का?

March 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..