
राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
यांचा बुऱ्हाणनगर गावातल्या त्यांच्या निवासस्थानातला जनता दरबार ते हयात असताना प्रचंड चर्चेचा विषय झाला होता. विशेष म्हणजे त्यांच्या जनता दरबारावर नगरच्या काही सायं. दैनिकांमध्ये बातम्यादेखील प्रकाशित करण्यात आल्या होत्या. माजी मंत्री स्वर्गीय कर्डिले यांच्या जनता दरबाराबद्दल त्यावेळी मोठी उत्सुकता व्यक्त केली जायची. त्यांच्या त्या जनता दरबाराचा आदर्श त्यांचे सुपुत्र युवा नेते अक्षय कर्डिले
हे सध्या चालवित आहेत. वडिलांचा हा आदर्श चालवित असताना अक्षय कर्डिले हे नगर तालुक्यातल्या मतदारांना माजी मंत्री स्वर्गीय कर्डिले यांची कधीच उणीव भासू देत नाहीत. त्यांच्या या जनता दरबाराला आज सहजच भेट दिली. त्या भेटीदरम्यान माजी मंत्री स्वर्गीय कर्डिले यांच्या कार्यपद्धतीचीच काहीशी आठवण झाली.
मतदार संघातल्या कार्यकर्त्यांचे आणि सामान्य मतदारांचे प्रश्न मार्गी लावण्याची माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची जी कार्यपद्धती होती, तीच कार्यपद्धत युवा नेते अक्षय कर्डिले यांनी पुढे चालवली आहे. या जनता दरबारात उपस्थित असलेल्या प्रत्येकाची आस्थेवाईकपणे चौकशी करणं, प्रत्येकाला चहाचा आग्रह करणं, प्रत्येक सामान्य मतदाराची तक्रार नीटपणे ऐकून आणि समजून घेत त्यावर यशस्वी मध्यस्थी करण्याची माजी मंत्री कर्डिले यांच्या कामाची पद्धत होती. तीच पद्धत युवा नेते अक्षय कर्डिले यांनी अवलंबविली आहे. दोन गटांत वाद झाले असतील तर दोन्हीही गटांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं सविस्तरपणे ऐकून घेत दोन्हीही गटांतल्या कार्यकर्त्यांचं समाधान कसं होईल, अशा पद्धतीचा तोडगा युवा नेते अक्षय कर्डिले या जनता दरबारात काढतात आणि दोन्हीही गटांतल्या कार्यकर्त्यांना स्पष्ट अशी ताकीद देतात, की यापुढे आपसांत वाद करु नका.
कोणाचं पोलीस ठाण्यात काम पडलं असेल कोणाला सरकारी नोकरी हवी असेल कोणाला शेजाऱ्यांपासून त्रास होत असेल तर संबंधित पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांना मोबाईलवरुन संपर्क करत यातून मार्ग काढण्याच्या सूचना युवा नेते अक्षय कर्डिले देत आहेत. विशेष म्हणजे या जनता दरबारात तक्रारदारांची संख्या वाढत असली तरी यातून संबंधितांचं समाधान कसं होईल, यावर युवा नेते अक्षय कर्डिले यांचा जास्तीत जास्त भर असतो. सकाळी लवकर उठून युवा नेते अक्षय कर्डिले त्यांच्या कार्यालयात आलेल्या प्रत्येकाशी हितगुज साधल्यानंतरच पुढील दौऱ्याकडे जात असतात. वास्तविक पाहता हा विधानसभा मतदारसंघ मोठा आहे. या मतदारसंघात नगर तालुका, पाथर्डी तालुका आणि राहुरी तालुक्याच्या अनेक गावांचा समावेश आहे. त्यामुळे या मतदारसंघातल्या शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून त्या मतदाराच्या व्यथा ऐकून घेण्याचं आणि त्यातून मार्ग काढण्याचा युवा नेते अक्षय कर्डिले हे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत






