Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

साकळीकरांच्या ऐतिहासिक लढ्याचा दणदणीत विजय!साकळी फाट्यापासून गावापर्यंत रस्त्याचे थेट काँक्रीटीकरण; दोन्ही बाजूंनी पक्क्या गटारींचे काम वेगात

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 4, 2026
in जळगाव
0

उपसंपादक : मिलिंद जंजाळे
साकळी फाट्यापासून साकळी गावापर्यंतचा जीवघेणा, खड्डेमय आणि धुळीने भरलेला रस्ता अखेर इतिहासजमा होत आहे. २ जुलै २०२१ रोजी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साहेबराव जंजाळे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या तीव्र व ऐतिहासिक आंदोलनाला तब्बल काही वर्षांनंतर दणदणीत यश मिळाले असून, या मार्गाचे डांबरीकरण नव्हे तर थेट काँक्रीटीकरण सुरू झाले आहे. यासोबतच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पक्क्या गटारींचे बांधकामही वेगाने सुरू आहे.
आंदोलनातून विकासाचा मार्ग मोकळा
पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य, उन्हाळ्यात धुळीचे लोट आणि वर्षानुवर्षे अपघातांचा वाढता धोका — या समस्यांमुळे साकळीकर हैराण झाले होते. अखेर ग्रामस्थांनी एकजुटीने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले.
या आंदोलनानंतर मिलिंद जंजाळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण भेटी घेत पाठपुरावा केला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदने देण्यात आली. संबंधित अभियंता तडवी यांनी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव सादर करत प्रक्रिया गतीमान केली.
आमदार निधीतून मोठी मंजुरी
यावल-चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी या प्रश्नात विशेष लक्ष घालत मोठ्या निधीची मंजुरी आमदार निधीतून मिळवून दिली. परिणामी साकळी फाट्यापासून गावापर्यंतचा रस्ता आता मजबूत काँक्रीट स्वरूपात साकारत आहे.
ही मंजुरी मिळाल्यानंतर कामाला प्रत्यक्ष गती मिळाली आणि आज प्रत्यक्षात रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू झाले आहे.
कायमस्वरूपी तोडगा — सुरक्षित व सुखकर प्रवास
रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि दोन्ही बाजूंनी पक्क्या गटारी झाल्याने पावसाळ्यातील पाण्याचा निचरा सुरळीत होणार आहे. गावात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असून वाहतुकीस सुरक्षितता लाभणार आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि व्यावसायिक यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
कामाच्या दर्जावर ग्रामस्थांनी ठेवावी बारकाईची नजर
काम सुरू झाले असले तरी गुणवत्ता अबाधित राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साहेबराव जंजाळे यांनी साकळीकरांना स्पष्ट आवाहन केले आहे की:
“शासनाने मोठी रक्कम उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे काम उच्च प्रतीचे झाले पाहिजे. ठेकेदार आणि अभियंता यांच्यावर आंधळा विश्वास न ठेवता ग्रामस्थांनी स्वतः लक्ष ठेवून दर्जेदार काम करून घ्यावे. ही जबाबदारी आपली सर्वांची आहे.”
साकळी विकासाच्या नव्या उंबरठ्यावर
साकळीकरांच्या एकजुटीच्या लढ्याला अखेर यश आले असून काँक्रीट रस्त्यामुळे साकळी गाव विकासाच्या नव्या उंबरठ्यावर उभे आहे. ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साहेबराव जंजाळे आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
एकजुट, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि ठाम भूमिका — यामुळेच साकळीकरांनी अशक्य वाटणारे स्वप्न साकार केले!

Previous Post

वड्री येथे आदिवासी विकास परिषदेचा उत्साहात समारोप; मंत्री अशोक उईके यांचा तडवी भिल्ल समाजाकडून सत्कार

Next Post

अजूनही सुरुच आहे माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिलेंचा जनता दरबार…! तीच ‘स्टाईल’, तोच जनसंपर्क, प्रश्न मार्गी लावण्याची तीच पद्धत…! युवा नेते अक्षय कर्डिले चालविताहेत वडिलांचा आदर्श…!

Next Post

अजूनही सुरुच आहे माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिलेंचा जनता दरबार…! तीच ‘स्टाईल’, तोच जनसंपर्क, प्रश्न मार्गी लावण्याची तीच पद्धत…! युवा नेते अक्षय कर्डिले चालविताहेत वडिलांचा आदर्श…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजूनही सुरुच आहे माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिलेंचा जनता दरबार…! तीच ‘स्टाईल’, तोच जनसंपर्क, प्रश्न मार्गी लावण्याची तीच पद्धत…! युवा नेते अक्षय कर्डिले चालविताहेत वडिलांचा आदर्श…!

March 4, 2026

साकळीकरांच्या ऐतिहासिक लढ्याचा दणदणीत विजय!साकळी फाट्यापासून गावापर्यंत रस्त्याचे थेट काँक्रीटीकरण; दोन्ही बाजूंनी पक्क्या गटारींचे काम वेगात

March 4, 2026

वड्री येथे आदिवासी विकास परिषदेचा उत्साहात समारोप; मंत्री अशोक उईके यांचा तडवी भिल्ल समाजाकडून सत्कार

March 4, 2026

दिलासादायक: परदेशात अडकलेल्या नागरिकांशी प्रशासनाकडून संपर्क; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महत्वाची माहितीजिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

March 4, 2026

दोन अज्ञातांचा धुमाकूळ; यावलमध्ये आरटीआय कार्यकर्त्याच्या जीवाला धोका

March 4, 2026

‘आमचे जंगल, आमचा अधिकार!’ यावल वन्यजीव अभयारण्यच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा कडाडून विरोध

March 4, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..