Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

६७ सीसीटीव्ही तपासले, लुटीचा पर्दाफाश; रावेर पोलिसांचा मोठा विजय

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 25, 2026
in क्राईम
0

रावेर तालुका | प्रतिनिधी : आदित्य गजरे

रावेर तालुक्यात खळबळ उडविणाऱ्या ८ लाख रुपयांच्या लूटप्रकरणाचा रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने यशस्वी पर्दाफाश केला आहे. अवघ्या काही दिवसांत ७ आरोपींना अटक करून पोलिसांनी तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत समाधान व्यक्त होत आहे. बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचे कर्मचारी गौरव वाघ व तौफिक तेली यांना सावदा, फैजपूर व रावेर परिसरात वसुलीसाठी पाठवले होते. रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास खानापूर आरटीओ बॅरेलजवळ ८ ते ९ इसमांनी त्यांच्या दुचाकीला अडवून रोख रकमेची बॅग हिसकावून नेली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळी सीसीटीव्ही नसतानाही पोलिसांनी हार न मानता रावेर, सावदा व फैजपूर परिसरातील तब्बल ६७ सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच सायबर विभागाच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा माग काढण्यात आला.गोपनीय माहितीच्या आधारे रावेर येथील बंडू चौक परिसरातून ७ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.अटक आरोपी :फारुख शेख रईस (१९), अत्ताउल्लाह खान दाऊद खान उर्फ सोनू, शेख सईद शेख कादर उर्फ सुपडू, शेख समीर शेख कलीम उर्फ चिकू, राहील खान दाऊद खान, रहेमान खान अय्युब खान उर्फ भुऱ्या व अक्रम खान इस्माईल खान.आरोपींकडून २ लाख ५५ हजार रुपये रोख व ९५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शेख हसन शेख अफजल उर्फ हसन फावड्या हा सराईत गुन्हेगार असून तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत.न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या आरोपींना २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक अनिल बडगुजर तसेच मा. श्री अण्णासाहेब घोलप, पोलीस उपअधीक्षक (चोपडा विभाग – अति. कार्यभार) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील, गुन्हे शोध पथक व सायबर विभागातील अधिकारी-अंमलदारांनी मोलाचे योगदान दिले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे रावेर तालुक्यातील नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Previous Post

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे माजी विधानसभा अध्यक्ष अशोक बोरेकर यांचा कार्यकर्त्यांसह ‘रिपब्लिकन सेनेत’ जाहीर प्रवेश अशोक बोरीकर यांची ‘जिल्हा उपाध्यक्ष’ पदी वर्णी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६७ सीसीटीव्ही तपासले, लुटीचा पर्दाफाश; रावेर पोलिसांचा मोठा विजय

February 25, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे माजी विधानसभा अध्यक्ष अशोक बोरेकर यांचा कार्यकर्त्यांसह ‘रिपब्लिकन सेनेत’ जाहीर प्रवेश अशोक बोरीकर यांची ‘जिल्हा उपाध्यक्ष’ पदी वर्णी

February 25, 2026

दुसखेडा पेपर मिल स्टेशन परिसरात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती — ग्रामपंचायतीचे अक्षम दुर्लक्ष उघड

February 25, 2026

चुकीच्या तोलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; गणेश टोल काटा बंद करण्याची मागणी

February 25, 2026

दोन बहिणींचे अपहरण, अल्पवयीन मुलीवर अत्याचार बीड हादरल माजलगावता नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 25, 2026

भुसावळ–फैजपूर मार्गावरील वृक्षतोड प्रकरण तापले; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

February 25, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..