Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जळगावात वाळू डंपर सोडण्या साठी मागितली लाच 50 हजारांच्या लाच प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला ताब्यात.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 13, 2026
in क्राईम
0

जळगाव प्रतितिधी
जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे वाळूने भरलेला डंपर पकडल्या नंतर त्यावर कायदेशीर कारवाई न करता सोडून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यातील ३० हजार रुपये स्वीकारताना महसूल विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे या कारवाईत ममुराबादचे तलाठी सदानंद व्यंकटी मुंडे (वय ३४) आणि म्हसावदचे मंडळ अधिकारी अभिजित नामदेव येवले (वय ३९) यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाळू व्यवसायिक आहेत ४ फेब्रुवारी रोजी तलाठी सदानंद मुंडे यांनी वाळूने भरलेला डंपर ताब्यात घेतला होता मात्र, मंडळ अधिकारी अभिजित येवले यांच्या फोनवरील सूचनेनंतर कोणतीही कारवाई न करता तो डंपर सोडून देण्यात आला ही कारवाई टाळण्यासाठी दोघांनी मिळून ५० हजार रुपयांची लाच मागणी केल्याचा आरोप आहे या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ११ फेब्रुवारी रोजी एसीबीकडे अधिकृत तक्रार दाखल केली तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे जळगाव शहरात ३० हजार रुपये स्वीकारताना तलाठी सदानंद मुंडे याला रंगेहात पकडण्यात आले त्यानंतर मंडळ अधिकारी अभिजित येवले यालाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले या कारवाई मुळे महसूल विभागातील लाचखोरीचा प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत एसीबीची ही धडक कारवाई लाचखोर अधिकाऱ्यांसाठी मोठा इशारा मानली जात आहे.

Previous Post

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपमानजनक टिप्पण्या करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाईसह नार्को टेस्ट करण्यात यावी–नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम ची मागणी

Next Post

अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री गोळीबारचा थरार; तरुण गंभीर,निवडणूक वादातून हल्ला; एकाला रिक्षासह अटक, मुख्य आरोपी फरार

Next Post

अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री गोळीबारचा थरार; तरुण गंभीर,निवडणूक वादातून हल्ला; एकाला रिक्षासह अटक, मुख्य आरोपी फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावलमध्ये ACB ची धडक कारवाई : वनरक्षकावर लाच मागणीचा गुन्हा, वनविभागातील भ्रष्टाचार उघड

March 31, 2026

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ व ‘येलो’ अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

March 30, 2026

संजय बाचकर सरांचा वाढदिवस शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजराहॅलो बातमीदार

March 30, 2026

भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलिस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ

March 30, 2026

स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

March 29, 2026

गाळमुक्त धरणांमुळे शिवाराला नवे जीवन!आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

March 28, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..