Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

ज्योती विद्या मंदिर विद्यालय, सांगवी बुद्रुक येथील केंद्रावर बारावी परीक्षा मंगळवारपासून सुरू

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 9, 2026
in शैक्षणिक
0

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

सांगवी बुद्रुक ता. यावल महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली असून सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्या मंदिर विद्यालय येथे केंद्र क्रमांक ८२० अंतर्गत परीक्षा शांततेत सुरू होईल. या केंद्रावर एकूण ६७६ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत.

या परीक्षा केंद्राअंतर्गत बोरखडा खुर्द, कठोरा, हिंगोणा, भालोद, अट्रावल, सांगवी बुद्रुक तसेच परिसरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे.

या ठिकाणी कला (आर्ट्स), विज्ञान व वाणिज्य (कॉमर्स) या तिन्ही शाखांतील विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता परीक्षा केंद्रावर आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परीक्षा कक्षांची योग्य मांडणी, आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्याचबरोबर परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासकीय स्तरावरही योग्य नियोजन करण्यात आले आहे.

परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक व्हावी यासाठी दक्षता समिती, केंद्र संचालक, पर्यवेक्षक, पर्यवेक्षण शिक्षक तसेच अतिरिक्त कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार भरारी पथक देखील कार्यरत ठेवण्यात आले आहे.

परीक्षा सुरळीत, शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता राखण्याचे निर्देश देण्यात आले असून अनावश्यक गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनही सज्ज आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी वेळेआधी केंद्रावर उपस्थित राहावे, प्रवेशपत्र व ओळखपत्र अनिवार्यपणे सोबत ठेवावे, तसेच महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्याधपक आर.एम.भंगाळे यांच्याकडून करण्यात आले आहे. परीक्षा कालावधीत पालक व नागरिकांनीही संयम राखून सहकार्य करावे, असेही स्पष्ट केले आहे.

Previous Post

सौ.यशश्री देवकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश ‘माझी लाडकी बहिण’ योजनेच्या KYC साठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ

Next Post

अहिल्यानगर महापालिकेत सहा स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार…..असे आहेत पात्रतेचे निकष…

Next Post

अहिल्यानगर महापालिकेत सहा स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार…..असे आहेत पात्रतेचे निकष…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुकाराम मुडे यांची पुन्हा बदली; 29 वर्षात 24 बदली

April 1, 2026

यावलमध्ये ACB ची धडक कारवाई : वनरक्षकावर लाच मागणीचा गुन्हा, वनविभागातील भ्रष्टाचार उघड

March 31, 2026

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ व ‘येलो’ अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

March 30, 2026

संजय बाचकर सरांचा वाढदिवस शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजराहॅलो बातमीदार

March 30, 2026

भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलिस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ

March 30, 2026

स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

March 29, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..