Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

इचखेडा मार्गावरील खालकोट वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड? वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी तीव्र

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 8, 2026
in क्राईम
0

उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
यावल पश्चिम व पूर्व विभागाच्या वनक्षेत्रात येणाऱ्या इचखेडा मार्गावरील खालकोट वनराई परिसरात मोठ्या प्रमाणावर सागवानासह इतर मौल्यवान वृक्षांची तोड सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या कथित वृक्षतोडीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जंगल संवर्धनाच्या नावाखालीच जंगल साफ करण्याचा प्रकार सुरू असून रात्रीच्या वेळी व दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचे दिसून येत आहे. सागवानासारख्या मौल्यवान वृक्षांवर कुरघोडी केली जात असून लाकूड माफियांचा वावर वाढल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे “ही वृक्षतोड नेमकी कोणाच्या छत्रछायेखाली सुरू आहे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर या प्रकरणात वन विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांची संपत्ती व कामकाज तपासण्याची मागणी केली आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, या भागातील वनराई ही स्थानिक हवामान, भूजल पातळी आणि जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने अंधाधुंद वृक्षतोड सुरू राहिल्यास भविष्यात दुष्काळ, मृदस्खलन व वन्यजीवांचा ऱ्हास यासारखे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
दरम्यान, नागरिकांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ वनसंरक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि सुरू असलेली कथित वृक्षतोड त्वरित थांबवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
या प्रकरणी वन विभागाकडून अधिकृत भूमिका समोर येणे अपेक्षित आहे.

Previous Post

अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?, खासदार बजरंग सोनवणेंच्या दाव्याने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इचखेडा मार्गावरील खालकोट वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड? वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी तीव्र

February 8, 2026

अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?, खासदार बजरंग सोनवणेंच्या दाव्याने खळबळ

February 7, 2026

अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला, तांत्रिक बिघाड, लँडिंगचा अँगलच चुकला?

February 7, 2026

यावल तालुका आरोग्य विभागाचा पुढाकार  क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप; उपचारासोबत पोषणावरही भर

February 7, 2026

साकळीच्या मातीतून उगवला ‘कृषीसेवक’! प्रगतिशील शेतकरी दीपक महाजन यांचा राज्यस्तरीय सन्मान

February 7, 2026

सियोना उर्फ स्विटीबाळाचा पहिला वाढदिवस स्नेहसदन चर्चमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

February 7, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..