
उपसंपादक मनसुर तडवी
कल्याण सिम्बिंयोसिस प्रायमरी & सेकंडरी स्कूल
मेनेज बाय.कामिनि एज्युकेशन ट्रस्ट जिल्हा ठाणे यांच्या तर्फे
शैक्षणिक महोत्सव वर्ष तिसरे साजरा करण्यात आला या महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतातील पाल तालुका रावेर या आदिवासी गावातील इयत्ता पहिली चा विद्यार्थी अलियान इम्तियाज तडवी वय सात वर्ष या विद्यार्थ्याने दोन्ही हातांनी काठी (आखाडा)फिरवून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले दोन्ही काठीचे वेग इतके होते की प्रक्षकांना असे वाटत होते की काहीतरी गोल गोल चक्र फिरत आहे सुरुवातीपासूनच महोत्सवात टाळ्यांच्या गजरात अलियान चा स्वागत करण्यात आला या एका लहानश्या चिमुकल्या आदिवासी मुलाने आदिवासींची पारंपरिक संस्कृती काठी फिरउन आखाडा ची परंपरा राखत आदिवासी तडवी भिल्ल समाजाचे नाव रोशन केले अलीयान आणि त्यांचे आई-वडील यांचे समाजाकडून व्हाट्सअप वर प्रत्यक्ष फोन करून आदिवासी समाजाकडून अभिनंदन चा वर्षाव करण्यात आले
अलियान चे वडील इम्तियाज सलीम तडवी हे बृहन्मुंबई विजपूरवठा व परीवहन उपक्रमा मध्ये सूरक्षा व दक्षता विभागात सूरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत अलियान इम्तेयाज तडवी इय्यता १ ली याने महोत्सवात सहभाग नोंदवून आदिवासी तडवी भिल समाजाचा पारंपरिक सांस्कृतिची आठवण करून दोन्ही हाताने काठी फिरवून जोरदार प्रदर्शन प्रक्षकान समोर मोठ्या हिमतीने करून दाखवले वय ७ वर्षे व दोन्ही हातांनी काठी फिरवने सोपे नव्हे पन अलियाच्या हिमतीची दाद द्यावी लगेल एवढ्या कमी वयात त्याने हा पराक्रम करून दाखवला या साठी प्राचार्य हिमांशी दूबे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले






