Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनिल चोभे,उपाध्यक्षपदी बाळासाहेब गदादे तर सचिवपदी शशिकांत पवार, खजिनदारपदी अविनाश निमसे

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 19, 2026
in ताज्या बातम्या
0

नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनिल चोभे
उपाध्यक्षपदी गदादे तर सचिवपदी शशिकांत पवार, खजिनदारपदी अविनाश निमसे
अहिल्यानगर :/प्रशांत बाफना
नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील चोभे, उपाध्यक्षपदी बाळासाहेब गदादे, सचिवपदी शशीकांत पवार तर खजिनदारपदी अविनाश निमसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नगर तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक नुकतीच जेष्ठ पत्रकार लहुकुमार चोभे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष सुनील हारदे यांनी सुनील चोभे यांच्या नावाची सूचना मांडली. या सूचनेस उपस्थित सर्वांनी अनुमोदन दिले. त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड सर्वानुमते करण्यात आली.
या बैठकीस माजी अध्यक्ष योगेश गुंड, जितेंद्र निकम, नितीन देशमुख, नागेश सोनवणे, ज्ञानदेव गोरे, आजिनाथ शिंदे, संजय ठोंबरे, भाऊ होळकर आदी पत्रकार उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील चोभे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “पत्रकार संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील. पत्रकारांचे हित जपताना समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल. पत्रकार संघ अधिक सक्षम, संघटित आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू.”
नगर तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न, नागरिकांच्या अडचणी तसेच सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघ कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित पत्रकारांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
नूतन पदाधिकाऱ्यांचे दै. नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के, दै. पूण्यनगरीचे संपादक राजेंद्र झोंड, दै. पुढारीचे संपादक संदीप रोडे, दै. लोकआवाजचे संपादक विठ्ठल लांडगे, दै. नगरी दवंडीचे संपादक राम नळकांडे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या

Previous Post

*शिरपूरच्या भावेरमध्ये सत्तेचा माज! सरपंच पतीची उघड गुंडगिरी; प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांसह महिला पत्रकारांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ*

Next Post

दरोड्यातल्या आरोपी आणि त्याच्या साथीदारांकडून १२ गुन्हे उघडकीस…! अहिल्यानगर एलसीबीची दमदार कामगिरी…!

Next Post

दरोड्यातल्या आरोपी आणि त्याच्या साथीदारांकडून १२ गुन्हे उघडकीस…! अहिल्यानगर एलसीबीची दमदार कामगिरी…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इचखेडा मार्गावरील खालकोट वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड? वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी तीव्र

February 8, 2026

अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?, खासदार बजरंग सोनवणेंच्या दाव्याने खळबळ

February 7, 2026

अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला, तांत्रिक बिघाड, लँडिंगचा अँगलच चुकला?

February 7, 2026

यावल तालुका आरोग्य विभागाचा पुढाकार  क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप; उपचारासोबत पोषणावरही भर

February 7, 2026

साकळीच्या मातीतून उगवला ‘कृषीसेवक’! प्रगतिशील शेतकरी दीपक महाजन यांचा राज्यस्तरीय सन्मान

February 7, 2026

सियोना उर्फ स्विटीबाळाचा पहिला वाढदिवस स्नेहसदन चर्चमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

February 7, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..