Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

मुंबईत महापौर कोण? मुख्यमंत्री फडणवीस देणार धक्का यांची नावे आघाडीवर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 18, 2026
in राजकीय
0

मुंबई: /प्रशांत बाफना संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अखेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचा पराभव झाला. भाजप आणि शिवसेनेने बहुमताचा आकडा पार करत मुंबईची सत्ता काबीज केली. त्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबईत भाजप सार्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपचाच महापौर होणार, हे स्पष्टच आहे.

मुंबईतील ठाकरेंची 25 वर्षांपासूनची सत्ता उखडून टाकण्यात अखेर भाजपला यश आले आहे. भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला 29 जागांवर विजय मिळाला आहे. बहुमतापेक्षा त्यांच्याकडे चार नगरसेवक अधिक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल, असे स्पष्ट केले आहे.

भाजपमधील 89 नगरसेवकांमध्ये अनेक मातब्बर चेहरे आहेत. त्यामध्ये ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसमधून आलेल्या काही नेत्यांचाही समावेश आहे. तसेच नेत्यांचे नातेवाईकही निवडून आले आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी मोठी रस्सीखेच असणार, हे स्पष्टच आहे. त्यासाठी मोठे लॉबिंगही सुरू होईल. अर्थात ही सर्व गणितं महापौरपदासाठी आरक्षणावर अवलंबून असणार आहेत.

महापौरपदासाठीची चर्चेतील नावे: मुंबई महापालिकेत मिळालेल्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा महापौर असेल असे आज स्पष्ट केले आहे. महापौरपदाच्या शर्यतीत तेजस्वी घोसाळकर, मकरंद नार्वेकर, प्रकाश दरेकर, प्रभाकर शिंदे, प्रीती सातम, उज्ज्वला मोडक डॉ. प्रज्ञा सामंत, राजेश्री शिरवडकर, शीतल गंभीर देसाई यांची नावे चर्चेत आहेत.

महापालिका निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या तीन दशकांच्या सत्तेला या निवडणुकीत धक्का बसला आहे. या विजयाला फडणवीस यांनी ‘विकासाभिमुख शासनाचा विजय’ असे म्हटले आहे. राज्यात नवीन राजकीय युगाची सुरुवात झाली आहे. हा विजय भाजपसाठी ऐतिहासिक मानला जात आहे. या विजयामुळे महाराष्ट्राच्या शहरी राजकारणात मोठे बदल घडले असून, नागरी प्रशासनात नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. असे ते म्हणाले.

Previous Post

प्रवीण दरेकरांनी उत्तरभारतीयांचे आभार मानले , नव्या वादाला तोंड फुटणार?

Next Post

*शिरपूरच्या भावेरमध्ये सत्तेचा माज! सरपंच पतीची उघड गुंडगिरी; प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांसह महिला पत्रकारांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ*

Next Post

*शिरपूरच्या भावेरमध्ये सत्तेचा माज! सरपंच पतीची उघड गुंडगिरी; प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांसह महिला पत्रकारांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कंटाळवाणं लोडशेडिंग…! सायंकाळी होतोय डासांचं प्रचंड सुळसुळाट…! सकाळच्याऐवजी संध्याकाळी वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी…!

March 26, 2026

सावदा येथील सरकारी दूध डेअरीत पोलिसांचा मोठा छापा; दुधाच्या आड सुरू असलेली दारूची तस्करी उघड

March 26, 2026

किनगाव आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; दोन गरोदर मातांना एकाच बेडवर उपचार! प्रशासन झोपेत?

March 25, 2026

रावेर–यावल तालुक्यात भोंदू बाबा अशोक खरातचे ‘कनेक्शन’ ? अधिकाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत चर्चेला उधाण

March 25, 2026

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..