Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

प्रवीण दरेकरांनी उत्तरभारतीयांचे आभार मानले , नव्या वादाला तोंड फुटणार?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 18, 2026
in राजकीय
0

मुंबई:/प्रशांत बाफना मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहे. “ भाजप मुंबई तोडणार नाही, तर जोडणार” अशी ग्वाही देत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. विशेषत: उत्तर भारतीय आणि हिंदीभाषक मतदारांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांना कृतज्ञता व्यक्त केली.

प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांनी दहिसरमधील वॉर्ड क्रमांक तीनमधून विजय मिळवला आहे. या विजयानंतर बोलताना दरेकर म्हणाले की, ‘मी’ हिंदीभाषी, उत्तर भारतीयांचा मनापासून आभारी आहे. मुंबईत मराठी भाषक आणि उत्तर भारतीयांमध्ये तेढ निमाृण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही नेत्यांकउून करण्यात आला. मात्र, मुंबईकरांनी आणि स्वत: मराठी माणसाने अशा फूट पाडणार्‍या राजकारणाला नाकारले आहे.

मुंबईत सर्वजण आजही गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत, हेच या निकालातून सिद्ध झाले आहे. “ यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंचे नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली. ते एका वाहिनीशी बोलत होते.

दरम्यान, दरेकर यांनी विजयाचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिले. ते म्हणाले की, “ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन परिश्रम घेतले. मुंबईकरांचा एकनाथ शिंदे आणि ‘ देवाभाऊ’ यांच्यावर असणारा विश्वासच आज मतांच्या रूपाने समोर आला आह . हा विजय केवळ भाजपचा नसून विकासावर विश्वास ठेवणार्‍या प्रत्येक मुंबईकराचा आहे.”

उत्तर भारतीय समुदायाचे आभार मानताना दरेकर म्हणाले, “ उत्तर भारतीयांनी दाखवून दिले की, ज्या मातीने त्यांना मोठे केले, त्या मातीचा आणि संस्कृतीचा ते सन्मान करतात. ते पूर्णपणे भाजपच्या पाठीशी उभे राहिले, असे ते म्हणाले. मुंबईत भाजपचे मिशन यशस्वी होत असून हर्षद कारकर, संजय घाडी आणि संजना घाडी यांसारख्या उमेदवारांनी मोठ्या ताकदीने विजय मिळवल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Previous Post

देवाभाऊने केला ठाकरेंचा टांगा पलटी!

Next Post

मुंबईत महापौर कोण? मुख्यमंत्री फडणवीस देणार धक्का यांची नावे आघाडीवर

Next Post

मुंबईत महापौर कोण? मुख्यमंत्री फडणवीस देणार धक्का यांची नावे आघाडीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कंटाळवाणं लोडशेडिंग…! सायंकाळी होतोय डासांचं प्रचंड सुळसुळाट…! सकाळच्याऐवजी संध्याकाळी वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी…!

March 26, 2026

सावदा येथील सरकारी दूध डेअरीत पोलिसांचा मोठा छापा; दुधाच्या आड सुरू असलेली दारूची तस्करी उघड

March 26, 2026

किनगाव आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; दोन गरोदर मातांना एकाच बेडवर उपचार! प्रशासन झोपेत?

March 25, 2026

रावेर–यावल तालुक्यात भोंदू बाबा अशोक खरातचे ‘कनेक्शन’ ? अधिकाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत चर्चेला उधाण

March 25, 2026

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..