Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अहिल्यानगर शहरात घरफोडी चोरी करणारा सराईत आरोपींकडुन 19,42,475/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 17, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
सावेडी, अहिल्यानगर शहरामध्ये घरफोडी चोरी करणारा सराईत आरोपींकडुन 19,42,475/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 13/12/2025 रोजी सायंकाळी 06.00 वा ते दिनांक 16/12/2025 रोजीचे 12/00 वा.चे दरम्यान फिर्यादी हे कुटुंबासह जयपुर येथे नातेवाईकांचे कार्यक्रमास गेले होते त्यादरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे राहते घराच्या मागील दरवाजाचे लोॅक कशानेतरी तोडुन आत प्रवेश करुन घरामध्ये ठेवलेले 14,75,000/-रु किमतीचे सोने, डायमंड, चांदी व रोख रक्कम चोरुन नेले आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी श्री अशोककुमार विजयकुमार अग्रवाल रा. बंगला क्र.06 विराज कॉलनी, सावेडी, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 1191/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(3), 331(4), 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर शहरामध्ये घरफोडीचे गुन्हे करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार, रविंद्र पांडे, सुरेश माळी, गणेश धोत्रे, शाहिद शेख, फुरकान शेख, दिपक घाटकर, बिरप्पा करमल, सतिष भवर, रोहीत येमुल, अमृत आढाव, प्रकाश मांडगे, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.
नमुद पथकाने गुन्ह्यातील आरोपींबाबत गोपनिय माहिती व व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती संकलित करुन आरोपीचे शोध घेत असतांना पथकास सदरचा गुन्हा रमेश कुंभार रा. वर्तनगनर ठाणे याने केले असल्याची माहिती मिळाली. दिनांक 16/01/2026 रोजी पथकाने नमुद आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव 1) रमेश महादेव कुंभार वय 49 रा. अमाप रेसीडेन्सी, फलॅट नं.203, कशेळी, ठाणेअसे असल्याचे सांगीतले त्यास वरील गुन्हे बाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा मी व माझे साथीदार 2) आशीष शिंदे रा. बारामती ता.बारामती जि. पुणे (फरार) अशांनी मिळुन केल्याची कबुली दिली आहे.
त्यानंतर ताब्यातील आरोपीचे ताब्यातुन व आरोपीचे सांगणे प्रमाणे 15,11,475/- रु कि.ची 104.670 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, 4,00,000/- रु की.ची मारुती सुझुकी कंपनीची SX4 मॉडेलची कार, 31,000/- रु की.चे सिल्व्हर रंगाचे मोठे 31 मोती, एक कटर, मोठे कटर असा एकुण 19,42,475/- रु कि.चा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Previous Post

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

Next Post

देवाभाऊने केला ठाकरेंचा टांगा पलटी!

Next Post

देवाभाऊने केला ठाकरेंचा टांगा पलटी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कंटाळवाणं लोडशेडिंग…! सायंकाळी होतोय डासांचं प्रचंड सुळसुळाट…! सकाळच्याऐवजी संध्याकाळी वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी…!

March 26, 2026

सावदा येथील सरकारी दूध डेअरीत पोलिसांचा मोठा छापा; दुधाच्या आड सुरू असलेली दारूची तस्करी उघड

March 26, 2026

किनगाव आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; दोन गरोदर मातांना एकाच बेडवर उपचार! प्रशासन झोपेत?

March 25, 2026

रावेर–यावल तालुक्यात भोंदू बाबा अशोक खरातचे ‘कनेक्शन’ ? अधिकाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत चर्चेला उधाण

March 25, 2026

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..