
प्रशांत बाफना जिल्हा प्रतिनिधी 8055440385
माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय, कॅश बॉक्सवाल्यांनो ‘रोक सके तो रोक लो’, हा रोहित पवारांचा भावनिक डायलॉग आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमू लागला आहे. अजितदादांना नेमकं काय झालंय? याचा शोध आता लागलाच पाहिजे अशी मानसिकता महाराष्ट्राची तयार झाली आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह महाराष्ट्र खरोखरच हादरला आहे. इतके लोकप्रिय नेतृत्व काळाने आपल्यातून अकाली हिरावून घेतले. तथापि, दादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूचे गुढ वाढतच चालले आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण दादांचा मृत्यू हा अपघात नसून काहीतरी गडबड असल्याची जाणीव आता संपूर्ण महाराष्ट्राला होऊ लागली आहे. आमदार रोहित पवार यांनी मात्र याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करतानाच या अपघाता संबंधी वेगवेगळी माहिती प्रसारमाध्यमांसमोर आणली आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असावे अशी शंका नक्कीच येऊ लागली आहे. कारण त्यांनी समोर आणलेल्या माहितीचे विश्लेषण केल्यावर वस्तुस्थिती स्पष्ट होत आहे. सामान्य जनतेला तांत्रिक गोष्टी कळत नाहीत म्हणून काहीही थापा मारण्यात अर्थ नाही. जर शेपटी सुरक्षित आहे, तर ब्लॅक बॉक्स सुरक्षितच असायला हवा. जर तो जळाला असेल, तर मग मात्र आता जनतेला उत्तरच हवंय! सत्य बाहेर आलंच पाहिजे! “अजितदादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाला आहे.” जरा विज्ञानाचा आणि लॉजिकचा आधार घेऊन या ‘सरकारी दाव्याची’ चिरफाड करायलाच हवी. विमानाचा ब्लॅक बॉक्स हा नेहमी विमानाच्या ‘टेल’ म्हणजेच शेपटीच्या भागात असतो. कारण हेच की, अपघात झाला तरी विमानाचा पुढचा भाग आदळतो, पण शेपटी सुरक्षित राहते. ब्लॅक बॉक्स हा प्लास्टिकचा डबा नसून ‘टायटॅनियम’ सारख्या अभेद्य धातूपासून बनलेला असतो. हा बॉक्स ११००°C (२०००°F) तापमान सलग १ तास आणि २६०°C तापमान सलग १० तास सहन करू शकतो. गुरुत्वाकर्षणाच्या ३४०० पट दाब सहन करण्याची त्याची क्षमता असते. मग प्रश्न हा उरतोच? घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडिओ सांगतायत की, विमानाची शेपटी पूर्णपणे सुस्थितीत आहे. जिथे शेपटीला साधी आग सुद्धा लागलेली दिसत नाही, तिथे त्या सुरक्षित कवचाच्या आत असलेला ‘ब्लॅक बॉक्स’ जळून खाक कसा होऊ शकतो? मीडिया आणि प्रशासनाला थेट सवाल करावासा वाटतो की, ज्या भागात आग पोहोचलीच नाही, तिथे लोखंड वितळवणारी उष्णता निर्माण झालीच कशी? टायटॅनियम वितळले पण शेपटीचे फायबर आणि पत्रे शाबूत राहिले, हे जगातलं आठवं आश्चर्य म्हणावं का? हे “ब्लॅक बॉक्स” जळालयं की “सत्य” काही वेगळंच आहे? दादांच्या विमान अपघातामागे कशाप्रकारे घातपात असू शकतो, अशी थिअरी मांडण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी प्रामाणिकपणे केला आहे. या निमित्ताने त्यांनी भाजपच्या ट्रोलर्स कंपूचाही समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मध्यंतरी म्हटले होते की, रोहित पवार भावनेच्या भरात बोलतात. त्याबाबतही खुलासा करताना रोहित पवारांनी मी भावनेच्या भरात बोलत असेन तर भाजप मला का ट्रोल करत आहे? असा सवाल केला आहे. अजित पवार यांच्यासाठी मीडिया मॅनेजमेंटचे काम करणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीच्या नरेश अरोरा यांनाही रोहित पवारांनी लक्ष्य करून हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही हे दाखवून दिले आहे!
अजितदादांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ज्यात अजितदादांसह, पायलट सुमित कपूर, सह-पायलट शांभवी पाठक, सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि अटेंडंट पिंकी माळी यांचा मृत्यू झाला. राजकीय वर्तुळात संशयकल्लोळ सुरू आहे. अपघाताच्या आधी वैमानिक आणि विमानाचे मॉडेल शेवटच्या क्षणी बदलण्यात आले, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. रोहित पवार यांनी प्राथमिक चौकशी अहवालात उशीर झाल्याबद्दल संशय व्यक्त केला आहे. आ. अमोल मिटकरी यांनी या घटनेच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. हा अपघात महाराष्ट्र राज्यासाठी मोठा धक्का मानला जात असून, त्यामागील तांत्रिक आणि संभाव्य राजकीय कारणांचा तपास सुरू झाला पाहीजे. सुरुवातीला या अपघातामागे धुक्याचा अंदाज, खराब हवामान आणि तांत्रिक बिघाड असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, पवार कुटुंबीयांनी या अपघाताच्या निप:क्षपाती आणि सखोल चौकशीची मागणी केल्याने यात काहीतरी काळेबेरे नक्कीच दिसते. या अपघातामध्ये अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स डॅमेज झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यासंदर्भात जय पवार यांनी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. जय पवार यांनी विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत, असं म्हटलं आहे. याशिवाय व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालवण्यास बंदी घालावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे आता पवार परिवार या अपघाताबाबत सांशक आहे हे सिद्ध झाले आहे. पण पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो की, अजितदादांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच शरद पवारांनी मात्र हा निव्वळ अपघात आहे, असे का सांगितले होते? व आता त्यांचे सारेच वारसदार हे संशयास्पद असल्याचे का बोलत आहेत? या साऱ्याच घटना चक्रवणाऱ्या ठरत आहे. या सगळ्यांचेच म्हणणे असे आहे की, विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत. महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून, त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे, असे दादांचे धाकटे पुत्र जय पवार यांचे देखील म्हणणे आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. रोहित पवार यांनी तर आतापर्यंत अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात तिसरी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य कमालीचे वाढले आहे. व्हीएसआरवर अनेक आरोप केल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात डीजीसीएनं दिलेल्या स्पष्टीकरणावरच आता आक्षेप घेतला जात आहे. याशिवाय व्हीएसआर विमान कंपनी आणि तेलुगु देसम पार्टीच्या नेत्यांचे संबंध असल्यानं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांना पदावरुन हटवण्यात यावं, अशी देखील मागणी करण्यात आल्याने केंद्र सरकारला देखील धक्का पोहोचल्याचे म्हटले जात आहे. या संपूर्ण प्रकरणात मोठा संशय निर्माण होत असल्यामुळे आता या अपघाताची खोलवर चौकशी होण्याची नितांत गरज आहे. कारण जर त्यात काही संशयास्पद असेल तर ही घटना महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी देखील भयानक ठरणार आहे. पाच निरपराधांचा बळी घेणाऱ्या या संशयास्पद घटनेची चौकशी व्हावी, हीच महाराष्ट्राची अपेक्षा आहे!
व्हीएसआर कंपनीकडून अनेक चुका?
व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केला जात आहे. अजितदादांच्या विमानाचा मुख्य पायलट सुमित कपूर खूप दारु प्यायचा. तो तीन ते चार वर्षांसाठी निलंबित झाला होता. व्हीएसआरमध्ये तो कमी पगारावर काम करत होता. रोहित सिंह हा व्हीएसआरचा मालक विजय सिंग याचा मुलगा आहे. तो सध्या अमेरिकेतील मायामी येथे जाऊन राहत आहे. श्वेता सिंग ही रोहित सिंग याची पत्नी आहे. तीदेखील एका जेट कंपनीत होती. तिकडे रॅकेट चालवण्याच्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यायची वेळ आली. सध्या ज्या चुका समोर आल्या आहेत त्यावर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. मुळात हवाई उड्डाण मंत्री यांचाच व्हीएसआर कंपनीच्या मालकाशी संबंध आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत जाऊन बसलाय. त्याला परदेशात जाण्याची परवानगी कशी काय मिळाली? लेगेसी आणि लिएर जेट ही वेगवेगळ्या प्रकारची विमाने आहेत, ती चालवण्यासाठी वेगळा परवाना लागतो. तुम्ही यापैकी एक विमान चालवत असाल तर दुसरे विमान चालवू शकत नाही. मात्र, सुमित कपूर आणि रोहित सिंग हे दोघेही ही विमाने चालवत होते. त्यामुळे आता व्हीएसआरकडून बनावट कागदपत्रं बनवण्याचे काम सुरु आहे. व्हीएसआरचा एक वैमानिक कॅप्टन कार्लोस हा व्हेनेझुएलाचा होता. तो भारतात येताना पॅसेंजर म्हणून यायचा. पण विमानात शिरल्यानंतर तो कॉकपीटमध्ये जाऊन विमान चालवायचा. व्हीएसआर कंपनीकडून अशा अनेक चुका लपवल्या गेल्या आहेत







